छत्रपती शिवाजी महाराज – भारतीय इतिहासाचे महान योद्धा
भारतीय इतिहासातील शक्तिशाली उदार व्यक्तिमत्त्वानी छत्रपती शिवाजी महाराज एक खास आणि विशेषत: असे महान योद्धा राजकारणातील धाडसी तसेच साहित्यातील सर्वात लाडके व आदरणीय प्रतिष्ठित महान व्यक्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील गंभीरता, महत्व आणि जीवन परिचय (Chhatrapati Shivaji Maharaj Information) आज आपल्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
नाव | शिवाजी शहाजीराजे भोसले |
राजघराणा | मराठा |
वंश | भोसले |
राज्याभिषेक | 6 जून 1674 |
जन्म तारीख | 19 फेब्रुवारी 1930 / 3 एप्रिल 1680 |
जन्म स्थळ | शिवनेरी, पुणे |
पत्नी | सईबाई, सकबरबाई, पुतलाबाई, सोयराबाई |
पालक | जिजाबाई, शहाजी राजे |
समाधी ठिकाण | रायगड किल्ला, महाराष्ट्र |
मृत्यू ठिकाण | रायगड, महाराष्ट्र, भारत |
गुरु | समर्थ रामदास |
मृत्यू | 3 एप्रिल 1680 |
छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रारंभिक जीवन

छत्रपती शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील सर्वोत्कृष्ट योद्धा आणि राष्ट्रनिर्माता म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 मध्ये महाराष्ट्राच्या शिवनेरी येथे जिजाऊच्या आश्रयाखाली झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणातील जीवनाची माहिती मध्ये अत्यंत कमी आहे. त्यांच्या बाल पणातील ज्ञानदेव म्हणजे रामदास स्वामी यांच्या आणि त्यांच्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे आणखी व्यासपीठ धारी होण्याची संधि मिळाली.
शिवाजी महाराजांनी शिस्त बद्ध व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक सामर्थ्य शाली आणि प्रागतीक राज्य हे उभा केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किनारी तसेच अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची दुरुस्ती करण्यासोबत त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले. ( Shivaji Maharaj Information in Marathi )
तोरणा किल्ला
तोरणा किल्ला हा महाराजांचा पहिला गड किल्ला होता. त्यानंतर राजगड आणि हळहळू एकून 360 किल्ले आपल्या ताब्यात घेतले आहेत. यासोबतच त्यावेळी तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, कान्होजी जेधे, येसाजी कंक, बाजी पासलकर अशी महान व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची ओढ
छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे शिवनेरी ( Shivneri Fort ) या किल्ल्यावरती झाले शिवनेरी सोबतची माऊली व पुणे येथे देखील त्यांचे बालपण गेलेले आपल्याला दिसून येते तसेच शहाजी महाराजांनी शिवाजी आणि जिजाबाई यांच्या हाती संपूर्ण महाराष्ट्राच्या जहागिरीची व्यवस्था सुरू केली आणि त्यांना पुणे या ठिकाणी पाठविण्यात आले जहागिरीची व्यवस्थापन स्वच्छ दादाजी कोंडदेव आणि काही विश्वासू सरदार बघत असायचे.
जिजामाता सारखाच शिवाजी महाराजांमध्ये कणकर्पणा आणि देशासाठी असलेले प्रेम आणि कठीण प्रसंगातून बाहेर येण्याचे ध्येय दिसून येत होते अशा गुणांमुळे छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य महाराजांना वाटू लागले तर आपल्याला आपल्या स्वराज्याची रक्षण करायचे असेल तर त्यासाठी गड किल्ले आपल्या ताब्यात असले पाहिजे
स्वराज्याची शपथ
रायरेश्वर किल्ल्यावर शिव शंभूच्या मंदिरात 26 एप्रिल 1645 साली 16 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. स्वराज्याचे तोरण बांधताच त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते. महाराजानीं धाडसी तरुणांचा समूहसुद्धा त्यांच्यासोबत बनवला होता. त्याला त्यांनी ‘मावळा‘ असे नाव दिले होते. ह्याच मावळ्यांच्या साथीने त्यांच्यामध्ये धर्मप्रेम निर्माण करून त्यांना लढाईचे प्रशिक्षण दिले आणि त्यानंतर स्वराज्याची संकल्पना त्यांना सांगितली. हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांनी त्यांच्या रक्ताचे पाणी केले, त्यांनी विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना आपल्यासमोर झुकायला लागले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा
अखेर तो दिवस उजेडला ज्याचे सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते म्हणजेच तो दिवस सहा जून 1674 ला गागाभट्ट यांनी हिंदू परंपरेनुसार अनेक ज्येष्ठांच्या आणि श्रेष्ठांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपूर्ण पार पाडला त्यांनी शिवराय हे चलन सुरू केले संपूर्ण राजगड त्या दिवशी सजवण्यात आला होता महाराज केवळ शूर आणि युद्ध निघूनच नव्हते तर ते उत्तम प्रशासक देखील होते.
महात्मा गांधी माहिती मराठी, जीवन परिचय
धर्माच्या नावाखाली त्यांनी काही कोणासोबत पक्षपात केलेला नाही त्यांच्या दरबारातील काही अधिकारी आणि अंगरक्षक मुस्लिम समुदायाचे सुद्धा होते तसेच त्यांनी कधीही कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाही शत्रूच्या स्त्रियांना देखील सन्मानपूर्वक परत पाठवत असत 6 जून 1674 रोजी छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा हा रायगड ( Raigad Fort )या किल्ल्यावर पार पडला यावेळी 32 मन वजनाचे सुवर्ण सिंहासन घडविण्यात आलेले होते यावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले.
पावनखिंड युद्ध
अफजलखानाच्या मृत्यूनंतर आदिलशहा फार चिडलेला आणि त्यांनी सिद्धी जोहरला सैन्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा नाश करण्यासाठी पाठवले होते सिद्धी जोहरने पन्हाळगड ला चौफेर वेडा घातलेला व त्या वेड्यातून सिद्धीला तुरी देत राजे सैनिकांचे विशालगडाकडे रवाना झालेले होते शिवाजी महाराजांचा पाठलाग करसिद्धीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत घातले आणि त्या ठिकाणीच लढाई सुरू झाली छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तेथून म्हणजेच पावनखिंडीतून जाण्याची विनंती केली.
बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विशाल गडाकडे कुच करण्याची विनंती केली. बाजीप्रभू देशपांडे म्हणतात की “लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे” असे म्हणत शिवरायांना विशाल गडाकडे जाण्याची विनंती केली. तसेच बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या शौर्याची सीमा गाठत सिद्धीच्या सैन्याला पावनखिंडमध्ये रोखून धरले. विशाल संख्येने असलेल्या सैन्याला बाजीप्रभू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले प्राण्याचे बाजी लावत त्या ठिकाणी झुलवत ठेवले.
शिवाजी महाराजांच्या काळातील काही प्रमुख घडामोडी
शिवबांनी आता पंचवीस ओलांडली होती त्यांचा शत्रूही आता नाईलाजास्तव असतो का होईना आदराने शिवाजी राजे असा उल्लेख करू लागला भारतासह परदेशातील राज्यकर्त्यांपर्यंत शिवाजी राजांचा पराक्रम पोहोचला होता. यातून शिवरायांना दैवी पुरुष, दैवी अवतार, चमत्कार करणारे, एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसणारे, अचानक अदृश्य होणाऱ्या अशा प्रकारचे बिरुदेही चिकटली. यातून अनेक मिथकेही निर्माण होऊ लागली. विशेषतः शिवाजीराजांचा पराक्रम शौर्य, विजयाची खात्री, प्रचंड दहशत इत्यादी बाबत बादशहापासून सामान्य सैनिकांच्या मनात भीतीयुक्त कुतूहल होते तर लोकार्थाने जहागीरदार पुत्र होते.
लहानशा स्वराज्याचा कारभार वडिलांच्या नावाने पहात होते असे असतानाही शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी, स्रीया, युवक, आबाल, वृद्ध, व्यापारी, सेनाधिकारी, सेना, कलाकार सर्व आनंदात होते. शेतकरी स्वच्छेने कर भरणा करत होते. स्वराज्य निर्माण विस्तार व्यवस्थापन ही अखंडित प्रक्रिया सुरूच होती. अगदीच गरज भासल्याशिवाय राजेंनी शत्रूविरोधात हाती शस्त्र धरले नाही. शत्रूची ही जीवित हानी होणार नाही एवढी काळजी घेत असत. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा शिवरायांनी केलेला बहुमान, सन्मान, आदर स्वराज्या बाहेर आणि विशेषतः मोघल शाही, आदिलशाही, कुतुबशाहीत सामान्यांसाठी विशेष भावनिक चर्चेचा विषय झाला होता. यातून शत्रू सैन्यात एक भावना पसरली की शिवाजी राजांच्या राज्यात प्रत्येक स्त्रीला देवता स्वरूप मानले जाते. ( Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi )
शिवाजीराजे व अफझलखान भेट
शिवाजी राजांना संपवायचेच या विश्वासाने शपथ घेऊन अफझलखानाने विजापूर सोडले. शहाजी महाराज हे कर्नाटकात सावध होते. त्यांनी विश्वासू सरदारांच्या माध्यमातून अफझलखानाची इत्यांबूत माहिती मिळवून शिवाजीस पाठवली. शिवाजी राजांचे हेर खातेही होते. अफजल खान विजापूर सोडणार त्याच्या एक दिवस अगोदर त्याच्या फौजेतील मानाचा हत्ती मरण पावला. अफझलखानाने आपल्या जनानखाण्यातील 200 स्त्रियांची भीतीमुळे कत्तल केली. अफजल खानाचे मनोधैर्य खचत जाईल व परिणामी सैन्यही नामोहरम होईल अशा अफवा शिवाजी राजांकडून सैन्यात तसेच परिसरातही पसरवल्या जात असत. अफझलखान वाईचा सुभेदार होता. त्याचा एकूण दरारा मोठाच होता.
यावेळी शिवाजी राजे राजगडावर जिजाऊ व सर्व कुटुंबासह होते. सईबाईंचा नुकताच मृत्यू झाला होता. शंभू बाळास तिसरे वर्ष चालू होते. खान राजगडावर चालून आल्यास कदाचित मोठा विध्वंस होऊ शकतो. त्यामुळे शिवाजी राजे जिजाऊंचे दर्शन घेऊन व कुटुंबाचा निरोप घेऊन किल्ले प्रतापगडावर आले. खानास जावळीतच गाठायचे या विश्वासाने शिवाजीराजांनी व्यूहरचना केली होती. अफझलखाना सारखा महाबलाढ्य महाकाय शत्रु प्रथमच समोरासमोर लढणार होता. त्यामुळे शिवाजी राजांनी जिजाऊंचे आशीर्वाद घेताना जिजाऊस एक संदेशही दिला होता. माझे बरे वाईट झाल्यास शंभू बाळास मांडीवर घेऊन स्वराज्य निर्माण करावे, असे शिवाजीराजांनी जिजाऊस सांगितले होते. यावरून अफझलखान व शिवाजी राजे भेटीचा वाचकांनी अंदाज करावा.
पन्हाळा गडचा अभेद्य वेढा
अफजलखानावरील विजयानंतर शिवाजी राजे व त्यांच्या फौजांनी पूर्व नियोजनानुसार कोकण, कोल्हापूर, पन्हाळगडावर धडका दिल्या. शिवाजीराजांनी पन्हाळगड घेऊन तेथील व्यवस्था लावून दिली. दरम्यान अत्यंत अपमानित झालेल्या आदिलशाहीने सिद्दी जौहरला सर्व शक्तीने शिवाजीस जेरबंद करण्यासाठी पाठवले. शिवाजी राजे किल्ले पन्हाळगडावर असताना सिद्दी जौहरने 2 मार्च 1960 रोजी मुंगी सुद्धा आज प्रवेश करू शकणार नाही एवढा अभेद्य वेडा दिला होता. त्याची जिद्द वाखाणण्यासारखी होते परंतु दुर्दैवाने त्याला पन्हाळगड भेदण्यास व जिंकण्यास यश येत नव्हते. ( Shivaji Maharaj Information )
पावसाळा सुरू झाला. पन्हाळगडाचा धो धो पाऊस पण सिद्दी जौहर हटला नाही. पन्हाळगडावर धान्य व इतर साहित्याचे कमतरता भासू लागली. शिवाजीराजांनी एक राजनैतिक डाव टाकला. सिद्दी जौहरकडे तहासह बिनशर्त त्याच्या फौजेतील तंबूत निवडक सहकाऱ्यांसोबत घेऊन शरण येण्याचा निरोप दिला. सिद्दी जौहरने खात्री करून होकार दिला. शिवाजी राजांनी गुप्त खबरे व हेरा कडून सिद्दी जवळच्या सैन्यात शिवाजीराजे 12 जुलै 1960 ला रात्री शरण येणार असल्याचे बातमीही पसरवली. सैन्य सुस्तावले शिवाजीराजांनी हुबेहूब आपल्यासारख्याच दिसणाऱ्या शिवा काशिद नावाच्या मावळ्यास सर्व वेशभूषा व पालखी देऊन सिद्दी जवळच्या कॅम्पमध्ये पाठविले. त्याच वेळेस शिवाजी राजे निवडक सहकार्यांसोबत घेऊन गड उतरले. पूर्वनियोजित ठिकाणावरून बाहेर पडले. बांधल याची मावळ्यांची तुकडी शिवाजी राजेंना घेऊन विशाळगडाकडे निघाले दरम्यान सिद्दी जौहरच्या फौजेतील अफझल खानाचा मुलगा फाझल खान याने शिवा काशिद खरा शिवाजी नसून शिवाजीचे सोंग घेतलेला ‘मावळा‘ असल्याचे ओळखले शिवा काशिदला ( Shiva Kashid ) मृत्यू सामोरे जावे लागले.